Breaking News

दोरीउडी स्पर्धेत पेण संघ उपविजेता

पेण ः प्रतिनिधी

पहिल्या मुंबई विभागीय दोरीउडी (जम्परोप) चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन रायगड जिल्हा जम्परोप असोसिएशन व पनवेल महापालिका जम्परोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमधील सुकापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत पेण येथील युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनच्या (यूएसकेए) खेळाडूंनी सहा सुवर्ण व पाच रौप्यपदके जिंकून उपविजेतेपद पटकाविले. 18 वर्षाखालील गटात ‘यूएसकेए’च्या पेण येथील परिणीता मोकल, सौम्या झिंजे, हर्षाली पाटील यांनी सुवर्णपदक, रितूल म्हात्रेने रौप्यपदक, 12 वर्षाखालील गटात अर्णव एरणकर, रूद्र पाटील, आयुष पाटील यांनी सुवर्णपदक, सलोनी सावंत, प्रिन्स पाटील, स्पर्श पाटील यांनी रौप्यपदक; तर 18 वर्षावरील गटात रोशनी डाऊरने रौप्यपदक जिंकले. या सर्व खेळाडूंना रवींद्र म्हात्रे तसेच प्रथमेश मोकल यांचे मार्गदर्शन लाभले होते. स्पर्धेचे बक्षीस वितरण लक्ष्मी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष महेश पाटील व जम्परोप असोसिएशनचे महाराष्ट्रचे अध्यक्ष मंदार पनवेलकर, इंडिया जम्परोपचे सहसचिव संतोष खंदारे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास मुंबई विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply