Breaking News

मुलांचे संगोपन चांगल्याप्रकारे करणे हे आदर्श पालकांचे लक्षण आहे -तीर्थ स्वरूपदास स्वामी

स्वामींनी कर्जतमध्ये घेतली पालकांची शाळा

कर्जत : प्रतिनिधी

मुलांचे संगोपन करण्याच्या अनेक पद्धती आहेत.  पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल, टीव्हीपेक्षा चांगल्या गोष्टी ऐकायला व वाचायला शिकवल्या पाहिजेत. वयाच्या सहा वर्षांपर्यंत त्यांचे लाड करा मात्र त्यानंतर 16 वर्षांपर्यंत त्यांना शिस्त लावण्याकडे लक्ष द्या, असा सल्ला गुरुकुलच्या तीर्थ स्वरूपदास स्वामींनी पालकांना दिला.

कर्जत रोटरी क्लबने गुरुकुल इंटरनॅशनल स्कुलच्या सहकार्याने पालकसभेचे आयोजन येथील राज कॉलेजच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी तीर्थ स्वरूपदास स्वामी उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.

स्वामी पुढे म्हणाले की, आपल्या मुलांकडून कोणतीही चूक झाल्यास त्यांच्यावर ओरडू नका किंवा त्यांना मारझोड करू नका. त्यांना समजावून सांगा. त्यांच्यासाठी वेळ द्या, म्हणजे भविष्यात तुमच्यासाठीसुद्धा ते वेळ देतील. या वेळी पालकांच्या प्रश्नांना स्वामींनी समाधानकारक उत्तरे दिली.

कर्जत रोटरी क्लबचे अध्यक्ष हुसेन जमाली यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मनोहर नायडू यांनी प्रास्ताविकात पालकसभेचा उद्देश सांगितला. या वेळी रायगड भूषण विजय मांडे, राजाभाऊ कोठारी तसेच अभिनेता राहुल वैद्य यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर नायडू यांनी केले.  ब्रह्म स्वरूपदास स्वामी, जितेंद्र ओसवाल, सतीश श्रीखंडे, राहुल वैद्य, मनीषा सुर्वे, आशा ठोंबरे, नंदन भडसावळे,  सूर्याजी ठाणगे, डॉ. प्रेमचंद जैन यांच्यासह पालक या वेळी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply