Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सर्वसमावेशक सक्षमीकरण संकल्प यशस्वी होतोय

केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व हे जात, समुदायाच्या वर मास लीडर असे आहे. त्यामुळेच त्यांचा सन्मानासह सर्वसमावेशक सक्षमीकरण हा संकल्प यशस्वी होत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहारमंत्री आणि राज्यसभेतील उपनेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी शनिवारी (दि. 2) येथे केले.
अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या नवीन पनवेल येथील काळसेकर टेक्निकल कॅम्पस येथे अखिल भारतीय युपीएससी निवासी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. हज हाऊस, जामिया मिलिया, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ (एएमयू) आणि देशभरातील इतर व्यावसायिक कोचिंग केंद्रांकडून चालवण्यात येणार्‍या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सर्वसमावेशक अभ्यासक्रम या केंद्रातून दिला जाणार आहे. त्याचे उद्घाटन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या हस्ते करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह अन्य मान्यवर आणि संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले की, अल्पसंख्याक मंत्रालयाच्या बॅकअप टू ब्रिलियन्स धोरणामुळे अल्पसंख्याक समाजातील तरुण मोठ्या संख्येने नागरी सेवांमध्ये निवडले जात आहेत आणि इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत आहेत. सन 2014पूर्वी केंद्र सरकारी नोकर्‍यांमध्ये अल्पसंख्याक समुदायाची टक्केवारी पाच टक्क्यांपेक्षा कमी होती, ती आता 10 टक्क्यांहून अधिक झाली आहे.
गेल्या आठ वर्षांत मोदी सरकारने समाजातील सर्व घटकांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सक्षमीकरणासाठी न थांबता परिश्रमाचे आत्मविश्वासात रूपांतर केले आहे. 2014पूर्वी तीन कोटी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली होती, तर गेल्या आठ वर्षांत पाच कोटी 20 लाख अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे विशेषत: मुस्लिम मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण जे 70 टक्के होते ते आता सुमारे 30 टक्क्यांवर आले आहे आणि ते 0%पर्यंत खाली आणण्याचे आमचे ध्येय आहे, असे केंद्रीय मंत्री नक्वी म्हणाले.
प्रधानमंत्री विरासत का संवर्धन योजना (पीएम विकास) जी आजपासून लागू होत आहे ती गरजूंच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरेल. त्यांना रोजगाराभिमुख कौशल्य विकास प्रदान करेल, असा विश्वासही केंद्रीय मंत्री नक्वी यांनी या वेळी व्यक्त केला.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply