Breaking News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी रविवारी पनवेलमध्ये

7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे होणार लोकार्पण आणि भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल व उरण तालुक्यातील 7700 कोटी रुपयांच्या एक्स्प्रेस वे विकासकामांचे लोकार्पण तसेच भूमिपूजन रविवारी (दि. 3) सायंकाळी 5 वाजता केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.
पनवेल व उरण तालुक्यातील जनतेला उत्कृष्ट आणि जागतिक दर्जाचा रस्ता मिळावा यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे जेएनपीटी उरण ते पनवेल रस्त्याची मागणी व पाठपुरावा केला होता. त्यानुसार 3500 कोटी रुपयांचा जेएनपीटी पोर्ट रोड पूर्ण झाला असून त्याचे लोकार्पण होणार आहे.
कळंबोली येथील जंक्शनच्या वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने 800 कोटी रुपयांचा कळंबोली जंक्शन विस्तारीकरण प्रकल्प होणार असून त्याचे भूमिपूजन होणार आहे तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराचे भूमिपूजन होणार आहे. त्याचबरोबर उरण-जेएनपीटी-चौक या तीन हजार कोटी रुपयांच्या नवीन महामार्गाची घोषणा या वेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी करणार आहेत.
पनवेल, उरण आणि चौक परिसराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची विकासकामे होणार आहेत. त्यामुळे इंधन व वेळेची बचत, वाहतूक कोंडी आणि अपघातापासून मुक्ती, सहज आणि सोपा प्रवास तसेच उद्योगधंदे व व्यापाराला चालना मिळणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ चिंचपाडा गाव येथे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा होणार असून या कार्यक्रमास राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार राजन विचारे, खासदार कुमार केतकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रविशेठ पाटील, आमदार मंदा म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत पाटील, आमदार अनिकेत तटकरे, आमदार बाळाराम पाटील, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह इतर लोकप्रतिनिधी, अधिकारी यांची उपस्थिती असणार आहे.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply