Breaking News

लॉकडाऊनमध्ये नवी मुंबईकरांना 15 दिवसांची इलेक्ट्रिक बाइक राइड

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबई महापालिकेने सुरू केलेल्या युलू सायकलला लॉकडाऊनमुळे खीळ बसली आहे. लॉकडाऊनआधी नवी मुंबईकरांच्या पसंतीस उतरलेली इलेक्ट्रिकची  बाइक कल्पना पुन्हा नागरिकांच्या सेवेत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यानुसार नवी मुंबईकरांना 999 रुपये भरून 15 दिवस इलेक्ट्रिक बाइक आपल्या घरी ठेवून वापरता येणार आहे. 

नवी मुंबईकरांना कोरोना काळात सुरक्षित प्रवास करता येणार असून रिक्षा, बस व ट्रेनसारख्या सार्वजनिक वाहतुकीपासून सुटका मिळणार असून पनवेल, तळोजा, खारघर येथेही जाता येणार आहे. मुख्य म्हणजे ग्राहकाला 15 दिवसांनंतर पुन्हा पैसे भरून हवे तेवढे दिवस ही इलेक्ट्रिक बाइकची राइड घेता येणार आहे

पीपीई किट घालून युलू कंपनीचे कामगार ग्राहकाला संपूर्ण बाईक सॅनिटायज करून देणार आहेत. तसेच इलेक्ट्रिक बाइक चार्ज कशी करायची कशी निगा राखायची याचव प्रशिक्षण ग्राहकांना देण्यात येणार आहे. त्यानुसार 15 दिवस ग्राहकाने ती बाइक स्वतःकडे ठेवायची आहे. 15 दिवस अनिश्चित काळासाठी ग्राहक बाईक चालवू शकणार आहेत.

कोरोना काळात रिक्षा चालकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारले जात आहे. रेल्वे व परिवहन सेवा वापरताना देखील नागरिकांना धोका पत्करावा लागत आहे. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक बाईक चांगला पर्याय ठरण्याची शक्यता आहे. नवी मुंबई पुरताच प्रवास नागरिकांना करावा लागणार असला तरी खारघर, कामोठे, तळोजा, पनवेल येथेही नोकरीनिमित्त जाता येणार आहे.

त्याव्यतिरिक्त बाहेर जाण्याचा प्रयत्न ग्राहकाने केल्यास जीपीएस वरून ट्रेस करून ग्राहकाला कळवले जाणार आहे, असे युलू सायकलचे ऑपरेशन हेड दीपक शर्मा यांनी सांगितले आहे. अ‍ॅडव्हान्स पैसे भरलेल्यांना दिलासा मिळणार आहे. युलू अ‍ॅपमध्ये जाऊन ग्राहक तक्रार भागात जाऊन तिथे पैसे आगाऊ रक्कम भरल्याचे नमूद करावे लागणार आहे. त्यानुसार त्या ग्राहकांना वाढीव मुदत मिळणार आहे. त्यामुळे आगाऊ पैसे भरलेल्या ग्राहकांना कंपनीने दिलासा दिला आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply