नवी दिल्ली, मुंबई : कोरोनामुळे 24 तासांत देशभरात 1 हजार 76 नवे रुग्ण आढळले असून 32 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. याबरोबरच देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13 हजार 835वर गेली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या एक हजारने वाढली असली तरी 15 ते 31 मार्चमधील रुग्णसंख्येची तुलना करता 1 एप्रिलपासून शुक्रवार (दि. 17)पर्यंत हे प्रमाण 40 टक्के घटले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली. महाराष्ट्रात कोरोनाचे 288 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ही 3204 एवढी झाली आहे. मागील 12 तासांमध्ये महाराष्ट्रात कोरोनामुळे सात जणांचा, तर आतापर्यंत करोनामुळे 194 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.
Check Also
भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …