उलवे नोडमधील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयात उपक्रम
परिवहन सेवेचाही शुभारंभ
पनवेल : रामप्रहर वृत्त
उलवे नोड येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालय कार्यान्वीत झाले असून, सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त विद्यालयामध्ये सोमवारी (दि. 4) स्वागत समारंभाचे आयोजन रयतचे मॅनेजिंग कौंन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच विद्यालयाच्या परिवहन सेवेचाही शुभारंभ झाला.
उलवे नोड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयात सोमवारपासून सन 2022-23 या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्यानिमित्त विद्यालयामध्ये येणार्या विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यामध्ये नर्सरी ते सहावीपर्यंत्तच्या विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ आणि चॉकलेट देऊन स्वागत केले. यासोबतच या वेळी बसचे ही लोकार्पण लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या सोहळ्याला शकुंतला रामशेठ ठाकूर, विद्यालयाचे चेअरमन तथा पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, वर्षा प्रशांत ठाकूर, अर्चना परेश ठाकूर, गव्हाण ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच हेमलता भगत, शरद खारकर, एम. डी. खारकर, रयतचे सहाय्यक विभागीय अधिकारी शहाजी फडतरे, रोहिदास ठाकूर, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूल कमिटी सदस्य निलेश खारकर, राजेश खारकर, विद्यालयाच्या प्राचार्या मुक्ता खटावकर, श्री. कारंडे, सचिन खारकर, श्री. छत्रपती शिवाजी विद्यालय व ज. आ. भगत जुनिअर कॉलेजच्या प्राचार्या साधना डोईफोडे आदी उपस्थित होते.