Breaking News

रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजना निधीतून मोर्बे ते कोंडले, मोर्बे तलाव ते करंबेली तर्फे तळोजा रस्त्याचे काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 6) झाले.
पनवेल विधानसभा मतदार संघात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गतिमान पद्धतीने विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यानुसार त्यांच्या स्थानिक जिल्हा वार्षिक योजनेमधून मोर्बे ते कोंडले, मोर्बे तलाव ते करंबेली तर्फे तळोजा रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या कामासाठी 40 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या विकासकामाचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले.
या वेळी भाजपचे पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, ओ बी सी सेल रायगड जिल्हा एकनाथ देशेकर, पंचायत समितीचे माजी सदस्य भुपेंद्र पाटील, खैरवाडीचे संरपंच मंग़ल्या वारगडा, जनार्दन कोंळबेकर, रवींद्र पाटील, परशुराम नावडेकर, बाळाराम उसाटकर, रामदास म्हात्रे, दिनेश फडके, एकनाथ नाईक, भालचंद्र सिनारे, लक्ष्मण पाटील, दिपक बोडे, लहु मुंढे, पिंटु म्हात्रे, रमेश नावडेकर, चांगु चौधरी, पांडुरंग भगत, बापू चौधरी, मंगेश चौधरी, बबन भगत, ठेकेदार मयुर कदम यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply