Breaking News

टीका करताना भान ठेवणे गरजेचे

संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर चंद्रकांत पाटील यांचे खडे बोल

मुंबई ः प्रतिनिधी

शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग व दादरमधील मालमत्ता ईडीने मंगळवारी (दि. 5) जप्त केली. यानंतर संजय राऊतांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांसोबतच किरीट सोमय्या यांच्यावर आक्षेपार्ह शब्दांत टीका केली. त्यांचे हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभतात का? प्रत्येकाने टीका करताना भान ठेवणे गरजेचे आहे, मात्र संजय राऊत त्यांना जे संस्कार आहेत, त्यानुसार ते बोलतात, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

संजय राऊतांनी भाजपवर निशाणा साधतानाच किरीट सोमय्या यांच्यावरदेखील आक्षेपार्ह शब्दांमध्ये टीका केली. यावेळी जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो, तो आम्हाला अक्कल शिकवणार का? कोण आहे तो? मी तुमच्या बापाला घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही, असे राऊत म्हणाले.

यानंतर चंद्रकांत पाटलांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत रोज ते शिव्या देत आहेत. त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या भाषेची अपेक्षा आहे. त्यांनी वापरलेल्या शब्दांचं एक पुस्तक तयार करायचं काम मी एकाला दिलं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेला विचारणार आहे, ‘उखडणार आहेत का?’ ‘भिकारडे’ हे शब्द महाराष्ट्राच्या संस्कृतीत बसतात का? असे पाटील म्हणाले.

जनताही आता दुर्लक्ष करते!

दरम्यान, संजय राऊतांच्या पत्रकार परिषदांना आता लोक गांभीर्याने घेत नसल्याचा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला. सुरुवातीच्या काळात लोक कौतुकाने ऐकायचे. यांची भाषा, यांचं खोटं बोलणं, यांचे आरोप आता कुणी त्यांच्या पत्रकार परिषदा बघत नाहीत. बघितलं तरी गांभीर्याने घेत नाहीत, तर दुर्लक्षच करतात, असं राऊत म्हणाले आहेत.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply