उरण : प्रतिनिधी
लॉकडाऊननंतर 12 दिवसांपूर्वीच सुरू करण्यात आलेली करंजा-रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक करणारी तरसेवा बंदरात तीन नंबरचा धोक्याचा इशारा देणारा लाल बावटा लावण्यात आला असल्याने 4 जुलैपासून अनिश्चित काळासाठी बंद ठेवण्यात
येणार आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर 22 जुनपासुन करंजा-रेवस तरसेवा शासनाच्या आदेशानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. फक्त 25 प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देताना सामाजिक अंतर ठेऊन बोटीमध्ये प्रवेश आणि प्रवास करण्याच्या अटी शर्थींचे निर्बंधही घालण्यात
आले आहेत.
खराब हवामानामुळे आणि बंदरात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लागल्याने ही तर सेवा 4 जुलैपासून हवामान पुर्ववत होईपर्यंत काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती करंजा बंदराचे निरिक्षक राहुल धायगुडे यांनी दिली आहे.