Breaking News

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रायगडात शांततेत मतदान; आज मतमोजणी

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी रविवारी (दि. 16) तुरळक घटना वगळता मतदान प्रकिया शांततेत पार पडली. थेट सरपंचपदाच्या 16, तर सदस्यांच्या 184 जागांसाठी मतदान झाले. सोमवारी (दि. 17) मतमोजणी होणार आहे. मतदानास सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरुवात झाली. सकाळी मतदारांचा उत्साह फारसा नव्हता. 11नंतर मतदान केंद्रावर गर्दी दिसू लागली. त्यानंतर दुपारी आणि संध्याकाळी मतदारांच्या रांगा पहायला मिळाल्या. जिल्ह्यात 61 मतदान केंद्र उभारण्यात आली होती. तेथे 309 कर्मचारी नेमण्यात आले होते. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून सर्वच केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मागील दोन आठवडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत होता. आश्वासनांच्या माध्यमातून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा उमेदवारांनी प्रयत्न केला. आता कोणाचा जोर किती कामाला आला याचे उत्तर सोमवारी होणार्‍या मतमोजणीतून समोर येणार आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply