Breaking News

व्यायाम हेच उत्तम आरोग्य राखण्याचे मार्ग : आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त
59 व्या महाराष्ट्र श्री 2022 या राज्य अजिंक्यपद शरीसैष्ठव स्पर्धेत मुंबई येथील अक्षय मोगरकर यांने ‘महाराष्ट्र श्री’ चा मान पटकावला आहे. विचुंबे येथे ही स्पर्धा बुधवारी (दि. 6) मोठ्या उत्साहात झाली असून, या स्पर्धेत राज्या भरातील अनेक स्पर्धाकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी व्यायाम हेच आरोग्य राखण्याचे मार्ग आहे असे मत व्यक्त करून आयोजकांना शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स असोसिएशन, बॉडी बिल्डर्स अँण्ड फिटनेस असोसिएशन रायगड, इंडियन बॉडी बिल्डर्स अँण्ड फिटनेस फेडरेशन आणि भारतीय जनता पार्टी विचुंब यांच्या वतीने 59 वी महाराष्ट्र श्री 2022 ही राज्य अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 8 वी वुमेन फिजिक, 5 वी  मेन फिजिक आणि दुसरी क्लासिक बॉडी बिल्डिंग स्पर्धा झाली. त्यानुसार मेन्स बॅाडीब्ल्डींग मध्ये मुंबई येथील अक्षय मोगरकर, वुमेंन्स बॅाडीबिल्डींग मध्ये हर्षदा पवार, मेंन्स क्लासिक बॅाडीबिल्डींगमध्ये उदय देवरे, मेंन्स फिजिक्स मध्ये गिरीश पाटील, आणि वुमेंन्स बिकीनी स्पर्धेत श्रद्धा आनंद यांनी खिताब पटकावला आहे. या सर्व विजेत्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेच्या उद्घाटनाच्या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक हरेश केणी, विकास घरत, तेजस कांडपिळे, रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, रवींद्र नाईक, भाजप युवा मोर्चा तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगीता भगत, उपसरपंच दिवेश भगत, भाजप नेते राजेश पाटील, प्रमोद भगत, आनंता गायकवाड, आलूराम केणी आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेल ग्रामीण भागातील रस्त्यांचा होणार विकास

50 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता; आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी व पाठपुराव्याला यश पनवेल …

Leave a Reply