कर्जत : बातमीदार
भारतीय जनता पक्ष आदिवासी मोर्चाचे कर्जत तालुका अध्यक्ष पदी माथेरानचे माजी नगरसेवक संदीप कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नेरळ येथे झालेल्या भाजप तालुका कार्यकारिणीच्या बैठकीत कदम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक नेरळ येथे झाली. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, जिल्हा चिटणीस रमेश मुंढे, भाजप किसान मोर्चाचे संघटक सुनील गोगटे माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, भाजप माथेरान शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, शहर उपाध्यक्ष किरण चौधरी, नितीन कांदळगावकर, नेरळचे माजी शहर अध्यक्ष अनिल जैन, अनिल पटेल आदी या बैठकीला उपस्थित होते.
या वेळी भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी संदीप कदम यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.