Breaking News

पनवेल, उरणमध्ये विकासकामांचा झंझावात

खिडूकपाड्यात गटार बांधकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेमार्फत खिडूकपाडा गावात विकासाचे पर्व सुरू झाले आहे. या अंतर्गत प्रभाग समिती ‘ब’मधील प्रभाग क्रमांक 9 येथे गटारांचे बांधकाम करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) करण्यात आला.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या कल्पकतेतून पनवेल महापालिकेमार्फत खिडूकपाडा येथे गटारांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी नगरसेविका चंद्रकला शशिकांत शेळके यांनी पाठपुरावा केला होता. या कामासाठी महापालिकेने एक कोटी 80 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.
गटार बांधकाम शुभारंभास पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ‘ब’चे सभापती समीर ठाकूर, नगरसेवक हरिश केणी, अमर पाटील, बबन मुकादम, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, शशिकांत शेळके, प्रकाश म्हात्रे, निलेश भोईर, शंकुनाथ भोईर, संजय उलवेकर, प्रभाकर उलवेकर, राहुल उलवेकर, अमर उलवेकर, मिननाथ भोईर, रवी उलवेकर, गुरूनाथ पाटील, विनोद पाटील, नरेश उलवेकर, मोहन वासकर, भरत भोईर, सुनील वासकर, नितेश भोईर, सनी भोईर, कुणाल भोईर, ज्येष्ठ मंडळी मधुकर गोंधळी, कुंडलिक उलवेकर, कमलाकर भोईर, विष्णू उलवेकर, विष्णू भोईर, रामा भोईर, अनंता पाटील, लक्ष्मण ठाकूर, सखाराम उलवेकर, बामा उलवेकर, शिवराम पाटील, रवी उलवेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.


वडघरमध्ये रस्ता काँक्रीटीकरण आणि पेव्हर ब्लॉकचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील वडघर येथे सिडकोतर्फे रस्ता काँक्रीटीकरण आणि पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम करण्यात येत आहे. या कामांचे भूमिपूजन उरणचे आमदार महेश बालदी आणि भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 5) करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील वडघर येथे सिडकोमार्फत मुस्लिम मोहल्ला व बौद्धवाडा येथील रस्त्यांचे काँक्रीटीकरण आणि ऊर्दू शाळा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामांच्या भमिपूजन समारंभास भाजपचे ज्येष्ठ नेते कर्णा शेलार, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, समिना साठी, महम्मद साठी, चंद्रकांत कांबळे, भरत सोनावणे, रज्जत रासोलकर, शीतल प्रवीण जाधव, केशव सोनावणे, आकाश बाबरे, दया बाबरे, अमित देशमुख, विनय देशमुख, रोशन ठाकूर, राहुल धुमाळ, भास्कर शेवाळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply