Breaking News

सेल्फीमुळे दाम्पत्याचा मृत्यू

गुहागरच्या हेदवी किनारी गेला तोल

रत्नागिरी : प्रतिनिधी

ठाण्यातून गुहागर येथे पर्यटनासाठी गेलेल्या एका दाम्पत्याला सेल्फीमुळे प्राणास मुकावे लागले आहे. सेल्फी घेतानाच झालेल्या दुर्घटनेत या दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला. या घटनेने पर्यटनस्थळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

गुहागरमधील निसर्गरम्य अशा हेदवी-बामणघळ येथे आई व मामेभाऊ यांच्यासमवेत पर्यटनासाठी गेलेले दाम्पत्य समुद्रकिनारी सेल्फी काढत असतानाच तोल जाऊन खाली पडले. या वेळी स्थानिक पोलीस पाटील आणि तरुणांनी दोघांनाही काही वेळात बाहेर काढले मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ठाण्यातील अनंत माणगावकर (वय 36) आणि सुचेना माणगावकर (वय 33) अशी या दाम्पत्याची नावे आहेत.

दरम्यान, समुद्रकिनारी वसलेल्या हेदवी येथे खडकांतून उसळणार्‍या लाटा अनुभवण्यासाठी पर्यटक येत असतात. थर्टी फर्स्ट व नवीन वर्ष यामुळे गेले काही दिवस येथे पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यात आज घडलेल्या या दुर्घटनेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किनार्‍यांवर अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना करण्याची गरजही या निमित्ताने निर्माण झाली आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply