रेवदंडा : प्रतिनिधी
मुरूड तालुक्यात भाजपची पहिली ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या मिठेखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जीवन सुतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
योगेश पाटील यांनी राजीनामा दिल्याने मिठेखार ग्रामपंचायतीचे उपसरपंचपद रिक्त झाले होते. ग्रामपंचायतीच्या थेट सरपंच सुवर्णा चवरकर यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी निवडणूक घेण्यात आली. या वेळी भाजपचे जीवन सुतार यांची मिठेखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली. जीवन सुतार हे भाजपचे मुुरूड तालुका सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत.
भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते यांनी नवनिर्वाचीत उपसरपंच जीवन सुतार यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या वेळी भाजपचे अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, मुरूड तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, माजी अध्यक्ष जयवंत अंबाजी, मिठेखार सरपंच सुवर्णा चवरकर, ग्रामपंचायत सदस्य अजय चवरकर, निलेश चवरकर, राकेश तांबडे, योगेश पाटील, सुचिता घाग, ज्योत्स्ना सुतार, निकिता चवरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.