Breaking News

रविशेठ पाटील विक्रमी मताधिक्याने विजयी होतील

नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा विश्वास; पेणमध्ये रॅली

पेण ़: प्रतिनिधी

महायुतीचे पेण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार रविशेठ पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला असून, त्यांना मिळणारा शहरातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता रविशेठ पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास पेणच्या नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी रविवारी (दि. 13) व्यक्त केला. रविशेठ पाटील यांच्या प्रचारासाठी भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रविवारी पेणमध्ये प्रचारफेरी काढून मतदारांशी संवाद साधला. या प्रचारफेरीदरम्यान प्रीतम पाटील बोलत होत्या. मागील 10 वर्षांत विकासकामे खुंटल्याने पेण, सुधागड मतदारसंघाची दुर्दशा झाली असून, या मतदारसंघाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याकरिता तसेच रविशेठ पाटील यांना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे, असे प्रीतम पाटील यांनी सांगितले. या रॅलीत नगर परिषदेचे बांधकाम सभापती देवता साकोस्कर, भाजप शहर अध्यक्ष हिमांशू कोठारी, अजय क्षीरसागर, सुप्रिया चव्हाण, उमेश मनोरे, संजय पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. रविशेठ पाटील हे अभ्यासू आणि ज्येष्ठ नेते म्हणून सर्वत्र सुपरिचित आहेत. मंत्रिपदाच्या काळात या मतदारसंघात अनेक कोटींची विकासकामे झाली आहेत, मात्र त्यानंतरच्या 10 वर्षांच्या काळात हा मतदारसंघ विरोधी पक्षाकडे गेला आणि फक्त आंदोलने होत राहिली. यामुळे आता आपल्याला मतदारसंघाचा विकास करायचा आहे. पेण नगरपालिका ही रविशेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करत असल्यामुळे आज शहराचा विकास मोठ्या प्रमाणात झाल्याचे जनतेला दिसत आहे व यामुळेच आता रविशेठ पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात ठेवून 21 तारखेला रविशेठ पाटील यांना मते देण्याचे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी प्रचारफेरीदरम्यान मतदारांना केले.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply