Breaking News

श्री साई बाबा मंदिरात श्री रामनवमी उत्सव; विविध आध्यात्मिक कार्यक्रम

पनवेल : वार्ताहर

परमपुज्य सदगुरु श्री साई नारायण बाबा यांच्या आर्शिवादाने पनवेल येथील श्री साई बाबा मंदिर येथे रविवारी (दि. 10) श्री रामनवमी उत्सवाचे औचित्य साधून विविध आध्यामिक कार्यक्रम झाले.

त्यानिमित्त प्रथमच श्री रामकथा (श्री रामचरित्र मानस पाठ) चे आयोजन करण्यात आले होते. श्री रामकथा पुज्य श्री दिव्यांशु महाराज-अयोध्या व त्यांच्या सहकार्‍यांनी सादर केली. या निमित्ताने पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल व पत्रकार संजय कदम यांच्या हस्ते उपस्थित पंडितांना जीवनावश्यक  वस्तूंचे वाटप करण्यात आले. सकाळपासूनच 140 विधवा माता भगिनींना महिन्याचे राशन व 110 पंडितांना भोजन देण्यात आले. पहाटे यज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री साई नारायण बाबा आश्रमव श्री भगवती साई संस्थान (रजि.)पनवेलचे चेअरमन खेमचंद गोपलानी, को-ऑडरीनेटर रामथदानी व सचिव रामलाल चौधरी यांनी दिली. हजारो भाविकांनी श्री साई बाबांचे व श्री साई नारायण बाबा चे आर्शिवाद घेतले.

साई मंदिरात येऊन सर्वांचे दुःख, विवंचना नष्ट होतात. वेळोवेळी येथील प्रत्येक कार्यक्रमांत मला सहभागी होता येते हे मी माझे भाग्य समजते. आजही येथील संस्थेचे पदाधिकारी व साई सेवक नि स्वार्थीपणे येथे येणार्‍या प्रत्येकाची सेवा करतात.

-डॉ. कविता चौतमोल, महापौर, पनवेल

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply