Breaking News

नगरसेवक मनोहर म्हात्रे यांना पितृशोक; माजी उपनगराध्यक्ष जानूशेठ म्हात्रे यांचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती व विद्यमान नगरसेवक मनोहर म्हात्रे यांचे वडील माजी उपनगराध्यक्ष जानूशेठ कानाशेठ म्हात्रे यांचे मंगळवारी (दि. 12) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 75 वर्षांचे होतेे.
धाकटा खांदा गणपती देवस्थानचे अध्यक्ष असलेल्या जानूशेठ म्हात्रे यांच्या निधनाचे वृत्त समजताच भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक-नगरसेविका यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
कै. जानूशेठ म्हात्रे यांचा दशक्रिया विधी गुरुवारी (दि. 21) श्रीक्षेत्र नाशिक, तर उत्तरकार्य रविवारी (दि. 24) राहत्या घरी होणार आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ आणि मोठा परिवार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply