पनवेल ः रामप्रहर वृत्त
खारघर परिसरात 19 ऑक्टोबर रोजी रात्री एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्यातील आरोपी हा अतिशय चाणाक्ष व हुशार असून एकांत ठिकाणावरून जाणार्या महिलेचा विनयभंग करून आरोपी पळून जात असे. ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने आरोपीचा शोध पोलीस घेत होते. गुन्ह्याचा मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू असताना घटनास्थळावरील व आजूबाजूंच्या सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून घटनास्थळ परिसरातील व इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजच्या अवलोकनावरून व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून गुन्ह्यातील संशयित आरोपी हा मानखुर्द परिसरात जयहिंदनगर, सोनापूर मुंबई येथे राहत असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी व अंमलदार यांनी संशयित इसम ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. अनिलकुमार कन्हैयालाल वाल्मिकी (वय 25, रा. जयहिंद नगर, सोनापूर, टी.एफ, डोनार सोसायटी मानखुर्द) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.