कर्जत : बातमीदार
रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबई या सेवाभावी संस्थेने कर्जत तालुक्यातील हुमगाव येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारले आहे. या केंद्राचे लोकार्पण रोटरीच्या पदाधिकार्यांनी केले. कर्जत तालुक्यातील 21 गावांमध्ये रोटरी क्लब ऑफ देवनार मुंबई या संस्थेने जलशुद्धीकरण संच, पोलिओ सर्जरी, शैक्षणिक साहित्य वाटप, सार्वजनिक शचालये बांधणे, आरोग्य शिबिरेे, बोअरवेल खोदणे, शाळांसाठी संगणक उपलब्ध करून देणे, सार्वजनिक वाचनालय उभारणे, शाळांसाठी फिल्टर प्लांट बसवून देणे आदी कामे केली आहेत. माजी सरपंच आणि ज्येष्ठ रोटेरियन शिवाजी बार्शी यांनी ग्रामीण रोटरीचे समन्वयक अर्जुन तरे यांच्यासोबत हुमगावात जलशुद्धीकरण केंद्र उभारावे, अशी मागणी देवनार रोटरीकडे केली होती. ती मान्य करून रोटरीने हुमगावात जलशुद्धीकरण संच बसविला आहे. त्या संचाचे लोकार्पण रोटरी देवनारचे ज्येष्ठ सदस्य कुलभूषण जेटली आणि अध्यक्ष सुधीर मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी हुमगावच्या सरपंच मनिषा बार्शी, ज्येष्ठ रोटेरियन कन्नन, देवनार रोटरीचे सदस्य नलिनी कन्नन, पद्मा कपूर, अर्जुन तरे, शिवाजी बार्शी, अरुण मसणे, संदीप तरे, प्रकाश सोनावळे, ज्ञानेश्वर खडेकर, अर्चना देशमुख, दशरथ मुने, प्रमोद बार्शी, दिलीप भुंडेरे, दिनेश धुळे, सुदाम बागडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.