पनवेल : वार्ताहर
पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर नाव जाहीर होईल, असे सूचक वक्तव्य पार्थ यांचे वडील आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. ते बुधवारी (दि. 13) पनवेल दौर्यावर आले असताना बोलत होते.
अजित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेलमध्ये हजेरी लावली. त्यांनी काँग्रेसच्या पदाधिकार्यांसोबत बैठक घेतली. या वेळी त्यांनी पार्थच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आलेलो नाही. आघाडीच्या जागा निवडून याव्या यासाठी आलो आहे, असे म्हटले.