Breaking News

पनवेल-बोरी मस्जिद जवळील समस्या दूर

पनवेल ः वार्ताहर

पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील टपाल नाका येथील बोरी मज्जीद जवळील फुटपाथ वरील गटाराची फ्रेम तुटलेल्या अवस्थेत होती. त्याची झाकण सुध्दा आत गेली होती. त्यामुळे रमजान महिन्यानिमित्त त्या मज्जीद मध्ये येणार्‍या बोरी बांधवांना याचा खूप त्रास  सहन करावा लागत होता. तसेच त्यात कोणीही पडुन दुर्घटना होण्याची दाट शक्यता होती. त्यामुळे येथील काही बोरी समाज बांधवांनी नगरसेवक राजू सोनी यांना बोलावून त्यांच्या निदर्शनास ही बाब लक्षात आणून दिली. त्यांनी क्षणाचा विलंब न लावता ताबडतोब त्यांचे सहकारी मंदार देसाई यांना सांगून ती तुटलेली फ्रेम आपल्या स्वतःच्या स्वखर्चाने बसवुन देण्यास सांगितले. त्यांनी ती फ्रेम बनवून ती लगेच बसवण्यात आली. त्यामुळे येथील बोरी समाजाच्या वतीने  नगरसेवक राजू सोनी व मंदार देसाई यांचे आभार मानले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply