Breaking News

सार्वजनिक गणेश मंडळांचा सन्मान

कळंबोली, पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रोत्साहन म्हणून कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या हस्ते गणेशोत्सव रद्द केलेल्या मंडळांना सोमवारी (दि. 31) प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.

कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी केलेल्या आवाहनाला साथ देत कळंबोली पोलीस ठाणे हद्दीतील एकूण 12 सार्वजनिक व 13 सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांनी सन 2020 चा गणेशोत्सव साजरा केला नाही. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.

या मंडळांना गौरविण्यात आल्याबद्दल सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केलेले असून, पोलीस प्रशासनास नेहमी सहकार्य करण्याचे आश्वासन केले आहे.

Check Also

रोजगार महाकुंभला पनवेलमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय …

Leave a Reply