भाजपच्या उपक्रमाला प्रतिसाद
नवी मुंबई ः प्रतिनिधी
भारतीय जनता पक्ष प्रभाग क्र 34च्या विद्यमाने गणेश नाईक ब्लड डोनेशन चैन यांच्या वतीने रक्तदान शिबिर आणि 55 वर्षांच्या वरील व्यक्तींसाठी मोफत हृदय तपासणी शिबिराचे आयोजन नेरूळ एल मार्केट सेक्टर 8मधील भाजप कार्यालय येथे अॅड. गणेश रसाळ यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. या आरोग्यदायी उपक्रमास नागरिकांनी मोठा प्रतिसाद लाभला .
युवा नेते व माजी नगरसेवक सुरज पाटील, भाऊ ठाकूर यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन सीताराम गायकवाड, निलेश पवार, राजेश बोरले, नारायण धोंडे, नवनाथ मांढरे, हरिश्चंद्र पाटील, महादेव खेडकर, एकनाथ बोरगे, अब्दुल नाईक, दिलीप धोंडे,तुकाराम जाधव, प्रमोद भोयर, हेमलता जाधव, योगिता रसाळ, गीता भोयर, सूर्यमती पाठक, साधना रसाळ यांनी केले होते. या शिबिरास शुश्रूषा हॉस्पिटल आणि त्यांच्या डॉक्टर पथकाचे सहकार्य लाभले.