Breaking News

विवाहितेवर सहा वर्षे लैंगिक अत्याचार

पनवेल : बातमीदार  : खारघरमध्ये राहाणार्‍या एका 40 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्या ओळखीतील 30 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार करून त्याचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर या तरुणाने हे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर गेल्या सहा वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेने खारघर पोलिसांकडे केली आहे. आरोपीने पीडितेला धमकावून तिच्याकडून 19 लाख रुपयेही उकळले आहेत. पोलिसांनी आरोपी तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

सन 2013मध्ये आरोपी तरुण घरकामासाठी महिलेचा शोध घेत असताना, त्याची ओळख पीडित महिलेशी झाली होती. त्या वेळी आरोपी तरुणाने पीडित महिलेसोबत मोबाईल फोनवरून संपर्क ठेवून तिच्याशी मैत्री वाढविली. त्यानंतर त्याने पीडित महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू केले. त्यानंतर मार्च 2013मध्ये त्याने पीडित महिलेच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्या वेळी आरोपी तरुणाने मोबाईलवरून त्यांच्यातील संबंधाचे व्हिडीओ चित्रीकरण केल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपी तरुणाने त्यांच्यातील संबंधाचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पीडित महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केले, तसेच तिच्याकडे पैसे व दागिन्यांची मागणी केली. त्यामुळे पीडित महिलेने घाबरून तिला घराच्या भाड्यापोटी मिळणारी रक्कम, तिच्या पगारातील व पतीची जमा रक्कम, तसेच मुलांच्या खात्यात जमा असलेली व बचत गटाकडून कर्ज काढून असे एकूण 12 लाख रुपये आरोपीला दिले, तसेच पीडितेचे सर्व दागिने पनवेलमधील सोनाराकडे गहाण ठेवून आलेले सात लाख रुपयेही त्याला दिले. त्यानंतरही मार्चमध्ये आरोपीने तो व्हिडीओ तिच्या पतीला व मुलांना दाखविण्याची धमकी देऊन पीडितेच्या घरामध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर या महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगून खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply