Breaking News

एसीपी किरण पाटील यांना पोलीस पदक

पनवेल : बातमीदार  : नक्षलवादी ते सुखवस्तू समाजात अंगावर खाकी वर्दी धारण करून गेल्या 32 वर्षांत गुन्हेगारांचे कंबरडे मोडणारे प्रमाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी अशी ख्याती असलेले मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त किरण पाटील यांना महाराष्ट्र दिनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल यांनी पोलीस पदकाने गौरविले आहे. राज्यातील 105 पोलीस पदक प्राप्त अधिकार्‍यांमध्ये किरण पाटील यांचा तिसरा क्रमांक लागला. त्यांनी पोलीस सेवेत कर्तव्य बजावताना संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांची उकल करताना निर्ढावलेल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांच्या निःपक्षपाती कामाची दखल घेऊन गृहखात्याने आतापर्यंत त्यांना 286 बक्षिसे देऊन सन्मानित केले आहे. पोलीस सेवेत अतिउत्कृष्ट कामगिरी करताना अंगावर चिखलफेक करण्याची खात्यांतर्गत किंवा गुन्हेगारांनाही संधी न देणार्‍या किरण पाटील यांनी खारघर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक, न्हावा शेवा बंदर विभाग आणि पनवेल, नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. पोलीस पदक प्राप्त झाल्याची बातमी मिळताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply