Breaking News

कंगनाच्या कार्यालयावर बीएमसीची कारवाई; न्यायालयाकडून स्थगिती

मुंबई : प्रतिनिधी

अभिनेत्री कंगना रनौतच्या मुंबईतील कार्यालयाचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगत महापालिकेने बुधवारी (दि. 9) कारवाई सुरू केली होती, मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या कारवाईला तूर्तास स्थगिती दिली आहे. या प्रकरणी गुरुवारी दुपारी 3 वाजता पुन्हा सविस्तर सुनावणी होणार आहे. मुंबई महापालिकेचे कर्मचारी सकाळी कंगनाच्या कार्यालयाबाहेर धडकले आणि त्यांनी तोडकाम सुरू केले. याविरोधात कंगनाचे वकील रिझवान सिद्दिकी यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. त्यानंतर हे तोडकाम तूर्तास थांबविण्यात आले आहे. दरम्यान, माझ्या घरात कोणतेही अवैध बांधकाम नाही तसेच कोरोना काळात 30 सप्टेंबरपर्यंत कोणत्याही तोडकामावर सरकारने बंदी घातली आहे. फॅसिझम असेच काहीसे असते, असे ट्विट कंगना रनौतने केले आहे.

उद्या तुमचं गर्वहरण होईल’

कंगना बुधवारी दुपारी मुंबईत पोहचली आणि तिने व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे तुम्हाला काय वाटतं. फिल्म माफियांसोबत मिळून माझं घर तोडून तुम्ही बदला घेतला आहे. आज माझं घर तुटलं आहे, उद्या तुमचं गर्वहरण होईल. हे वेळेचं चक्र आहे, नेहमी सारखं राहत नाही हे लक्षात ठेवा!

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply