Breaking News

भारनियमनावरून भाजप राज्यात रान पेटवणार

विरोधी पक्षनेत प्रवीण दरेकरांनी यांचा इशारा

मुंबई : रामप्रहर वृत्त

भारनियमनाला राज्यातील महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. नागरिकांकडून सुरक्षा अनामत रक्कम वसूल केली जात आहे. हे थांबविण्यासाठी भाजप आंदोलन करेल. वीज मंडळाच्या कार्यालयांवर भाजप आंदोलन करणार आहे, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर  यांनी दिला आहे. राज ठाकरेंची सभा, नवनीत राणा, हनुमान चालीसा या मुद्द्यांवरूनही दरेकर यांनी आघाडी सरकारला टोला लगावला आहे. संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला आहे

कोळसा टंचाई आणि ढिसाळ नियोजनामुळे राज्यात भारनियमन सुरू आहे. राज्यातील 27 वीज निर्मिती संयंत्र बंद आहेत किंवा देखभाल दुरुस्ती सुरू आहे. ऐन उन्हाळ्यात देखभाल दुरुस्ती केली जात आहे. वीजेची मागणी कमी असताना ही कामं केली जातात. मात्र, ऐन उन्हाळ्यात ही कामं सुरू आहे. चशील च्या सूचनांचे पालन केले जात नाहीए, असा हल्लाबोल दरेकर यांनी केला. फडणवीस सरकारच्या काळात भारनियमन केले नाही. सन 2018-19 मध्ये राज्यात वीज सरप्लेस होती. आता वीज नाहीए. राज्य सरकार केंद्र सरकारवर आरोप करत आहे. केंद्र सरकार कोळसा देत नाही, असे खापर फोडले जात आहे. पण केंद्र सरकारकडून राज्यला नेहमी पेक्षा जास्त कोळसा दिला जात आहे. राज्य सरकार स्वतः वीज निर्मती करत नाही, एकही नवा प्रकल्प सरकारने आणला नाही, असा निशाणा दरेकर यांनी साधला. कोळशाच्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असल्याचे पत्र खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष यांनी दिले आहे. कोणाचा कोणाला समन्वय नाही. महाजनकोला सबसिडीचे साडेतीन हजार कोटी रुपये द्यायचे आहेत, राज्य सरकार ते देत नाहीए. सरकारच्या खात्यांचे वेगवेगळा निधी देणं गरजेचं आहे, तो दिला जात नाही. खासगी वीज खरेदी केली जात नाही. खासगी वीज निवडक लोकांना देऊन कमिशन खाता यावं, हा प्रयत्न सरकारचा आहे, असा गंभीर आरोप दरेकर यांनी केला.

’ते‘ भाजपचे अभियान नाही

नवनीत राणा यांच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे. हनुमान चालीसा म्हणणे हे भाजपचे अभियान नाही, असे त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देणे आवश्यक आहे, मुस्कटदाबी करता कामा नाये. असदुद्दीन ओवेसी यांना सभेसाठी परवानगी देता. मग राज यांना का नाही? असा सवाल दरेकर यांनी केला. भाजपच्या पोलखोल यात्रेवरील दगडफेक प्रकरणी युवासेनेच्या दोन पदाधिकार्‍यांना अटक झाली आहे. यात स्थानिक आमदार त्यांचे पुत्र आणि कन्या सहभागी असल्याचा आमचा संशय आहे. सीसीटीव्ही फुटेज मागितले आहे, असं दरेकर बोलले.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply