Breaking News

टीम इंडिया ऑस्ट्रेलियाशी भिडणार

महिला संघांत रंगणार ऐतिहासिक कसोटी

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

भारतीय संघ जूनमध्ये इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. यंदा प्रथमच भारतीय पुरुष संघासोबत महिला संघही इंग्लंड दौर्‍यावर जाणार आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये एक कसोटी सामना खेळणार आहे. सहा-सात वर्षांनंतर भारतीय महिला संघाचा हा पहिलाच कसोटी सामना असेल, पण यानंतर दुसर्‍या कसोटीसाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागेल. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय महिला संघ सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाणार असून तेथे ते ऐतिहासिक डे-नाइट कसोटी सामना खेळणार आहे, अशी घोषणा केली आहे.

2006नंतर भारतीय महिला व ऑस्ट्रेलियन महिला संघ यांच्यात कसोटी सामना होणार आहे. महिला क्रिकेटमधील हा दुसराच डे-नाइट कसोटी सामना असेल. याआधी ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्यात 2017मध्ये डे-नाइट कसोटी सामना झाला होता. तो सामना अनिर्णीत राहिला. 15 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा हा कसोटी सामना वाका ग्राऊंडवर 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत खेळविला जाईल. ऑस्ट्रेलियन महिला संघ वाका ग्राऊंडवर (1958, 1984 व 2014) तीनच कसोटी सामने खेळले आहेत आणि तेही प्रथमच येथे डे-नाइट कसोटी खेळणार आहेत.

या दौर्‍यात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वन डे व तीन टी-20 सामन्यांची मालिकाही होईल. हे सामने नॉर्थ सिडनी ओव्हल व मेलबर्न येथे होतील. 2020च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या फायनलनंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.

संपूर्ण वेळापत्रक

19 सप्टेंबर – पहिला वन डे – नॉर्थ सिडनी (दिवस-रात्र)

22 सप्टेंबर – दुसरा वन डे – जंक्शन ओव्हल

24 सप्टेंबर – तिसरा वन डे – जंक्शन ओव्हल (दिवस-रात्र) 

30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर – कसोटी सामना (दिवस-रात्र)

7 ऑक्टोबर – पहिली टी-20, नॉर्थ सिडनी ओव्हल

9 ऑक्टोबर – दुसरी टी-20, नॉर्थ सिडनी ओव्हल

11 ऑक्टोबर – तिसरी टी-20, नॉर्थ सिडनी ओव्हल

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply