Breaking News

नेरळ-कळंब राज्यमार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम पुन्हा सुरु

कर्जत : बातमीदार

माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्गावरील नेरळ साई मंदिर नाक्यावरील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचे काम मंजूर आहे. मात्र या 900 मीटर लांबीच्या रस्त्याचा चार मीटर लांबीच्या भागाचे काँक्रीटीकरण झाल्यांनतर महिनाभर काम बंद होते. ते पुन्हा सुरु झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या संपुर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण होणार काय? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

नेरळ साई मंदिर नाका ते कळंब या 900 मीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. त्यापैकी चार मीटर भागात एक लेनचे काँक्रीटीकरण सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहे. त्याची दुसरी बाजू आणि उर्वरित रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

पावसाळा दोन महिन्यावर आला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करून घेण्यासाठी सूचना करण्याची गरज आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने काँक्रीटकरणाचे काम तात्काळ हाती घेण्याची मागणी नेरळ येथील जय मल्हार रिक्षा संघटनेचे अध्यक्ष श्रावण जाधव आणि इको रिक्षा संघटनेचे अध्यक्ष केशव तरे यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply