Breaking News

भाजपतर्फे मुरूडमध्ये मोफत आधार कार्ड शिबिर

मुरूड : प्रतिनिधी

तालुका भाजपतर्फे मुरूडमध्ये 27,28,29 एप्रिल रोजी मोफत नवीन आधार कार्ड व दुरुस्तीसाठी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले असून, त्याचा  नागरिकांनी फायदा घ्यावा, असे आवाहन भाजपचे  ज्येष्ठ नेते जनार्दन (आण्णा) कंधारे यांनी केले आहे. मुरूड तालुक्यात नेमकेच आधार कार्ड सेंटर असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. हे लक्षात घेऊन तालुका भाजपतर्फे शेगवाडा येथील पक्ष कार्यालयाजवळ तीन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नवीन आधार कार्ड काढणे, पत्ता बदलणे, नावात दुरुस्ती अथवा बदल करणे, फोटो अपडेट करणे, जन्मतारीख दुरुस्त करणे, फोन नंबर बदलणे, आधार कार्ड मोबाइलला लिंक करणे आदी होईल.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply