कर्जत : बातमीदार
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नवी मुंबईतील श्री साई ट्रस्ट या सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने कर्जत तालुक्यातील आसलवाडी येथील प्राथमिक शाळेसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. या स्वच्छतागृहाचे लोकार्पण गणेश अय्यर आणि राधिका घुले यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक, पालक आणि आसलवाडी ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.