Breaking News

टाळेबंदीमुळे भाड्याची घरे रिकामीच

पनवेल : बातमीदार

कोरोनामुळे नवी मुंबई शहरातील बहुतांश कामगार मूळ गावी स्थलांतरित झाले आहेत. जाताना कामगारांनी भाड्याच्या राहत्या खोल्या सोडल्या आहेत. खोल्या रिकाम्या झाल्यामुळे घरमालकांवर भाडेकरू शोधण्याची वेळ आली आहे. खोल्या भाड्याने देता याव्यात म्हणून घरमालक आर्थिक अडचणीत आले आहे.

नवी मुंबई शहर आणि परिसरामध्ये असलेल्या औद्योगिक कारखान्यांमध्ये नोकर्‍या करणारे बहुतांश कामगार भाड्याच्या खोल्यांमध्ये वास्तव्य करतात. मासिक भाडे देऊन कामगार आपल्या कुटुंबासह खोली घेऊन राहतात. 10 ते 15 हजार रुपये अनामत रक्कम आणि तीन हजार रुपयांपासून दहा हजार रुपयांपर्यंत घरभाडे आकारले जाते. दिघा, ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, सानपाडा, जुईनगर, तुर्भे आदी परिसरात कामगार मोठ्या प्रमाणात वास्तव्य करतात.

एमआयडीसीच्या जागेवर बांधण्यात आलेल्या झोपडपट्टीधारकांनी दुमजली घरे बांधली असून स्वत: तळमजल्यावरील खोलीमध्ये राहून वरचे घर हे भाड्याने देऊन त्यामध्ये उदारनिर्वाह करण्यात येतो. तर गावठाणामध्ये अर्ध्या वाट्याच्या तत्त्वार बांधकाम व्यावसांयिकांकडून मिळवण्यात आलेली घरे भाड्याने देऊन त्यामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्त आपला उदारनिर्वाह करत आहे. मात्र कोरोनामुळे मजूर घरे रिकामे करून गावी गेले आहे. सरकारकडून एमआयडीसीतील कंपन्या सुरू केल्या आहेत. मात्र तरीही मुंबईकडे कामगार येण्यास तयारी दर्शवत नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच अजून शाळा सुरू न झाल्यामुळे पालकांनीही गावीच राहणे पसंत केले आहे. परराज्यातील कामगार हे मुंबईतील वाढत्या करोनाच्या संख्येमुळे पुन्हा येण्यास धजावत नाहीत. त्यामुळे एप्रिल, मेमध्ये रिकाम्या झालेल्या खोल्या अजूनही बंदच आहे.

नवी मुंबई शहर आणि परिसरामध्ये खोल्या भाड्याने देण्याच्या व्यवसायामध्ये वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. तर काहींचे हातचे काम गेल्यामुळे डिपॉझिटमधून पैसे वळते करत भाडेकरूंनी गावचा रस्ता धरला आहे. काही घरमालकांना महिन्याला एक लाखापर्यंत भाडे मिळत होते. ते आता मिळणार नाही, असे ऐरोली येथील रवी पाटील यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply