वीज भारनियमन व सुरक्षा अनामत रकमेबाबत मविआ सरकारचा निषेध
पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यात होणार्या वीजटंचाई, भारनियमन व सुरक्षा अनामत रक्कम याबद्दल असलेल्या सरकारच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी खारघर मंडल भाजपच्या वतीने सोमवारी (दि. 25) सायंकाळी 7 वाजता कंदील आंदोलन करण्यात आले. खारघर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या शिल्पचौकात अंधार पडताच भाजपने कंदील लावून आंदोलन केले. या वेळी खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती अॅड. नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेवक प्रवीण पाटील, निलेश बाविस्कार, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, नगरसेविका नेत्रा पाटील, अनिता पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, युवा मोर्चाध्यक्ष विनोद घरत, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा संध्या शारबिद्रे, माजी नगरसेवक गुरुनाथ गायकर, सरचिटणीस साधना पवार, उत्तर रायगड जिल्हा सोशल मिडिया संयोजिका मोना अडवाणी, वैद्यकीय आघाडी संयोजक किरण पाटिल, ज्येष्ठ नागरिक सेलचे संयोजक नवनीत मारू, सोशल मिडिया संयोजक अजय माळी, युवा सरचिटणीस अमर उपाध्याय, विपुल चौटालिया, महिला मोर्चा उपाध्यक्षा प्रतिक्षा कदम, महिला मोर्चा चिटणीस अंकिता वारंग, निर्मला यादव, सुशीला शर्मा, प्रभाग 4अध्यक्ष वासुदेव पाटील, प्रभाकर जोशी, जयदास तेलवणे, संदीप एकबोटे, शैलेन्द्र त्रिपाठी, विनोद भुसा, हर्ष सोनावणे आदी उपस्थित होते. वीजटंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमाने हजारो कुटुंबीयांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सुरक्षा अनामत रकमेत दुप्पट वाढ करून महाविकास आघाडी सरकारने नागरिकांवर आर्थिक भूर्दंड लादल्याचा आरोप यावेळी अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी केला. नगरसेवक शत्रुघ्न काकडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या ढिसाळ व अनियोजित कारभारामुळे मागील तीन आठवड्यांपासून राज्यात विविध ठिकाणी विजेचा खेळखंडोबा सुरू झालेला आहे. वातावरणातील वाढत्या तापमानामुळे नागरिक हवालदिल होत असताना वीज बंद केल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक व आजारी माणसे त्रस्त झाले आहेत. भाजप खारघर मंडलाचे सरचिटणीस दीपक शिंदे यांनी सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची तत्परता परंतु सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकीवर मात्र निष्क्रियता तसेच राज्यातील जनतेला भारनियमनात ढकलल्या संदर्भात या परिसरात कंदील आंदोलन करून मविआ सरकारच्या विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त करीत असल्याचे सांगितले.