Breaking News

खोपोलीजवळ कंपनीच्या गाडीला अपघात; आठ कर्मचारी जखमी

खोपोली : प्रतिनिधी

खोपोली परिसरातील गोरडीया विप्रास स्टील कंपनीच्या कर्मचारी वाहतूक करणार्‍या गाडीला येथील सारसंग फाटा वळण रस्त्यावर मोठा अपघात झाला. यात आठ कर्मचारी जखमी असून, दोन जण गंभीर आहेत. या सर्वांवर खोपोलीतील पार्वती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. विप्रास स्टील कंपनीचे कर्मचारी संध्याकाळी पाच वाजता ड्युटी करून कंपनीच्या कारमधून खोपोलीत आपल्या घराकडे येत होते. सारसरण वळण रस्त्यावर समोरून आलेल्या भरधाव टेम्पो व या कारमध्ये धडक झाली. या वेळी दोन्ही वाहने उलटली. या अपघातात कारमधील सहा कर्मचारी, चालक व टेम्पोचालक असे आठ जण जखमी झाले आहेत. यातील दोन कर्मचारी गंभीर असून, या सर्वांवर खोपोलीतील पार्वती या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply