Breaking News

पनवेलमध्ये गरजूंना सायकलींचे वाटप

समाजसेवेचा वारसा जपा -रवींद्र दौंडकर

पनवेल : वार्ताहर

समाजसेवेचे छोटेखानी कार्य सुद्धा मोठ्या कार्यात रूपांतरित होते. यामुळे प्रत्येकाने समाजसेवेचा वारसा जपला पाहिजे, असे प्रतिपादन तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी केले. दिलासा फाउंडेशन पनवेल यांच्यातर्फे गरीब व गरजू व्यक्तींना शांतीवन येथे मोफत सायकल वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला शांतीवनचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद ठाकूर, कार्यवाहक विनायक शिंदे, अनिरुद्ध आदमाने, शांतिवन आश्रमशाळा मुख्याध्यापक उपस्थित होते. या वेळी सायकल मिळाल्याचा आनंद विद्यार्थी व नागरिकांच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत होता. गरजू नागरिकांना सायकल मिळावी यासाठी दिलासा फाउंडेशनने नागरिकांना आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि पाच सायकली जमा झाल्या. या पाच सायकलींचे वाटप शांतीवन येथे करण्यात आले. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर व शांतीवनचे अ‍ॅड. प्रमोद ठाकूर यांनी दिलासा फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले. सायकल ही काळाची गरज असल्याचे अ‍ॅड.प्रमोद ठाकूर यांनी सांगितले. या कार्यक्रमाला कुष्ठरोग निवारण समिती, शांतिवनच्या अध्यक्षा रक्षाताई मेहता यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षिका विजयश्री पाटील यांनी केले. कार्यक्रमास आश्रमशाळा शांतिवन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी रत्नाकर केणी, राऊत अंजली, दीपिका गायकवाड, गोसावी राजेंद्र, मदन गायकवाड, रमेश मुरे, ललिता तातरे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रिया रोडपालकर, अनुज रोडपालकर यांचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मनोहर सचदेव, उपाध्यक्ष डॉ. कृष्णा देसाई, सचिव मयुर तांबडे, सहसचिव बाळाराम रोडपालकर, खजिनदार विशाल सावंत, सदस्य अ‍ॅड. नागेश हिरवे, हरेश साठे, रोहन गावंड, दीपक जगे, वसंत जाधव, राज भंडारी यांनी विशेष मेहनत घेतली. यापुढेदेखील गरजू नागरिकांना सायकली वाटप करण्यात येणार आहेत, ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी अ‍ॅड. मनोहर सचदेव (7276666666), मयुर तांबडे (9323935050), डॉ. कृष्णा  देसाई (9372635443), बाळाराम रोडपालकर (9920594133), अ‍ॅड. नागेश हिरवे (7977472851) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply