Breaking News

शिक्षकांकडून डॉक्टरांचा सत्कार

चिमुकल्यांनी दिले संदेशात्मक पत्र

खारघर : प्रतिनिधी

सैन्य दिनाच्या औचित्यावर पनवेलमधील एमएनआर शाळेच्या शिक्षकांनी डॉक्टरांची भेट घेत डॉक्टरांचा सत्कार केला. कोविड काळात डॉक्टरांनी देशसेवेसाठी आपले जीव धोक्यात घालुन रुग्णांची सेवा केली. देशाच्या सीमेवर ज्याप्रकारे सैनिक आपल्या जीवाची बाजी लावतात त्याचप्रकारे डॉक्टरांनी आपली सेवा बजावल्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील चिमुकल्या मुलांनी बनविलेले संदेशात्मक पत्र या वेळी डॉक्टरांना सुपूर्द करण्यात आले.

एमएनआर इंटरनॅशन शाळेच्या संचालक सीमा जेनसन, मुख्याध्यापिका सुधा नायर तसेच शिक्षक व शिक्षकेतील कर्मचार्‍यांनी पनवेल शहरातील हांडे रुग्णलयातील डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचार्‍यांना शुभेच्छा पत्र तसेच तुळशीचे रोपटे देऊन सन्मानित केले. देशासह जगभरात कोविडच्या साथीने थैमान घातला आहे. या अशा परिस्थितीत डॉक्टर हे सैनिकासारखा लढा देत कोविडवर नियंत्रणाचा प्रयत्न करीत असल्याने आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे सीमा जेनसन यांनी सांगितले.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply