Breaking News

‘रमजान महिन्यात राष्ट्रीय एकात्मता, सद्भावना वृद्धिंगत होते’

बेणसे येथे इफ्तार पार्टीचे आयोजन

 

पाली : प्रतिनिधी

रमजान हा मुस्लीम समाजबांधवांसाठी अत्यंत पवित्र महिना असून, या महिन्यात राष्ट्रीय एकात्मता व सद्भावना वृध्दींगत होत असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांनी गुरुवारी (दि. 28) बेणसे येथे केले. बेणसे येथील मस्जिदमध्ये गुरुवारी सुर्यास्तानंतर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सूर्यवंशी बोलत होते. येथील हिंदू, मुस्लीम समाजबांधवांचे सलोख्याचे नाते, ऐक्य व मैत्रीपुर्ण सबंध जिल्ह्याला आदर्शवत ठरावे असे आहेत, असे कौतुकोद्गार सूर्यवंशी यांनी या वेळी काढले. सामाजिक कार्यकर्ते अजीम बेणसेकर, तंटामुक्त गाव अध्यक्ष मुजीप मोमिन यांनी रमजान महिन्याचे व रोजा उपवासामागचे महत्त्व विशद केले. नागोठण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी नारनवार, सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी मुस्लीम बांधवांना सर्व प्रकारची फळे, उपहार देण्यात आला. बेणसे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेश गोरे, तंटामुक्त गाव माजी अध्यक्ष संजय भोय तसेच अशोक भोय, लक्ष्मण खाडे, बशीर मांडरे, शौकत पित्त, ईलियास अक्तार, समिर चोगले, ईसाक पित्तु, नाविद मोमिन, इस्माईल पित्तु, इस्माईल बेणसेकर, नंदकुमार कुथे, अनिल गोरे, साहिल बेणसेकर, सलमान मोमिन, मनसुर मोमिन, अरबाज बेणसेकर, सलमान जुआरी, अदील बेणसेकर, मुसवीर  मोमिन यांच्यासह सर्व जाती, धर्माचे ग्रामस्थ  उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply