Breaking News

आगरदांडा संघाने भंडारी चषक जिंकला

मुरूड : प्रतिनिधी
1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मुरूड तालुक्यातील ग्रामस्थ डोंगरी सुभा संस्था आयोजित भव्य कबड्डी स्पर्धेत अटीतटीच्या अंतिम सामन्यात आगरदांड्याच्या जय बापदेव संघाने खारीकवाड्याच्या वादळ संघाचा पराभव करीत मानाचा भंडारी चषक जिंकला.
जय हनुमान खार आंबोली संघाने तृतीय, तर जय हनुमान डोंगरी संघाने चतुर्थ क्रमांक पटकाविला. विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ म्हणून खार आंबोलीच्या गावदेवी संघाची निवड करण्यात आली. उत्कृष्ट खेळाडू सिद्धेश पिंगळे, उत्कृष्ट चढाईपटू जयेश यादव, तर उत्कृष्ट पकडपटू दिनेश गिरणेकर ठरला. त्यांनाही बक्षिसे देण्यात आली.
कबड्डी स्पर्धेचे औचित्य साधून भंडारी समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांतील मुरूडसह अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुंबई, ठाणे आदी भागांतील 50हून अधिक मान्यवरांचा संस्थेतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन हृद्यसत्कार करण्यात आला.

Check Also

पनवेलमध्ये रविवारी खासदार श्रीरंग बारणे यांचा भव्य नागरी सत्कार

पनवेल ः रामप्रहर वृत्त मावळ लोकसभा मतदारसंघात सलग तीन वेळा विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले लोकप्रिय …

Leave a Reply