अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ, महिला मंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष खुल्या गटात श्री गणेश दिवलांग, तर महिलांमध्ये पनवेल संघाने विजेतेपद मिळवले. पंचक्रोशी गटात नांदई देवी नांदईचा पाडा हा संघ विजेता ठरला. खुल्या गटात अमिर धुमाळ, महिलांमध्ये रचना म्हात्रे, पंचक्रोशी गटात तुषार पाटील यांना सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. जिल्हास्तरीय पुरुष खुल्या गटात नवजीवन पेझारी संघ उपविजेता ठरला. तृतीय व चतुर्थ क्रमांक अनुक्रमे नवकिरण भेंडखळ व चतुर्थ जय हनुमान चरी यांनी मिळवला.
महिला गटात हिरकणी स्पोर्ट गडब संघ उपविजेता ठरला. ओमकार वेश्वी संघाने तृतीय, तर दिलखुष आवास संघाने चतुर्थ क्र्रमांक मिळवला.
पंचक्रोशी गटात नागेश्वर आवास संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. जय हनुमान स्पोर्ट्स पुतुबाईचा पाडा व जय हनुमान वाघोडे या संघानी तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले.
खुल्या पुरुष गटात ॠषिक पाटील पब्लिक हिरो ठरला. अमित ठाकूर याला उत्कृष्ट पकडीचे, तर बिपीन थळे याला उत्कृष्ट चढाईचे बक्षीस देण्यात आले.
महिलांमध्ये वृणाली पाटील पब्लिक हिरो ठरली. उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक हर्षला नाखवा हिला, तर उत्कृष्ट पकडीचे पारितोषिक सायली पाटीलला देण्यात आले.
पंचक्रोशी गटात शिरीष भगत पब्लिक हिरो ठरला. सुमित माने याला उत्कृष्ट पकडीचे, तर सर्वेश पाटीलला उत्कृष्ट चढाईचे पारितोषिक देण्यात आले.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …