Breaking News

कर्नाळा अभयारण्यात पक्षी संमेलन रंगले

पनवेल ः वार्ताहर

राज्यात 5 ते 12 नोव्हेंबरदरम्यान प्रथमच पक्षी सप्ताह आयोजित केला जात आहे. त्यानिमित्ताने सोमवारी (दि. 9) पनवेलजवळील कर्नाळा अभयारण्यातही पक्षी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे वन्यजीव विभागांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी कर्नाळा पक्षी अभयारण्य यांच्या माध्यमातून हे आयोजन करण्यात आले होते. पक्षी संमेलनास वनविभाग अलिबाग, सामाजिक वनीकरण पनवेल, पोलीस निरीक्षक पनवेल, ग्रामीणमधील कर्मचारी-अधिकारी, विविध संस्था, वन्य व पक्षीप्रेमी संघटना, ग्रीन वर्क ट्रस्ट पनवेल आदी उपस्थित होते. त्यांच्या वतीने महाराष्ट्रातील पक्ष्यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या संमेलनात पक्षी निरीक्षण, पक्ष्यांंची ओळख आदींची माहिती देण्यात आली. कोविडमुळे राज्यभरातील अनेक अभयारण्ये तसेच पर्यटनस्थळे बंद असल्याने अनेक पक्षीप्रेमींमध्ये निराशा आहे. त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे वेबिनार आयोजित करून पक्षीप्रेमींना सप्ताहामध्ये सहभागी करून घेतले जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी पी. पी. चव्हाण यांनी दिली. कर्नाळा अभयारण्यात देशी-विदेशी प्रजातीच्या पक्ष्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. यात सुमारे दीडशे प्रजातींचे पक्षी आढळतात. त्यात मोर, बुलबुल, भारद्वाज, तितर, गरूड, घार, पोपट, सुतार पक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज आदी जातींचे पक्षी आढळतात.

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply