Breaking News

सीकेटी महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे रहिवासी शिबिर उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 23 ते 29 एप्रिल दरम्यान नेरे येथील शांतीवन येथे 7 दिवसीय विशेष रहिवासी शिबिर उत्साहात झाले.

23 एप्रिल रोजी सायंकाळी 4 वाजता शिबिराच्या उद्घाटनला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आणि नेरे सरपंच राजश्री म्हस्कर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाचे मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे यांनी रविभागाच्या समाजकेंद्री उपक्रमांचा मागोवा घेतला. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.एस.के.पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे यांनी, स्वतःच्या अंगी असणार्‍या कलागुणांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहण्याबाबत सांगितले. समारंभाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश साठे यांनी केले व सूत्रसंचालन पोर्णिमा गायकवाडने केले. या वेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.बी.डी.आघावसुद्धा उपस्थित होते.

24 एप्रिलपासून शिबिराची सुरुवात योगासने व ध्यानसाधनेने झाली. सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान केले. शिबिरात राष्ट्रीय सेवा योजना: एक युवा चळवळ विषयावर सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. निलेश वडनेरे, पर्यावरण विषयक सल्लागार रश्मी जोशी यांचे भारतीय युवक आणि पर्यावरणपूरक जीवनशैली, भारतीय राज्यघटनेचे अभ्यासक अल्लाउद्दीन शेख यांचे स्वातंत्र लढ्यातील वेगवेगळ्या चळवळींचा प्रभाव, महाविद्यालयाच्या ग्रामीण विकास विभागाच्या प्रमुख डॉ. स्मिता भोईर यांनी ग्रामीण जीवन आणि समृद्ध भारत, वी.एन.एन.कॉलेज भिवंडीच्या अर्थशास्त्र विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ.विकास उबाळे यांनी नवभारत घडविण्यासाठी युवकांची भूमिका, कान,नाक, घसा तज्ज्ञ डॉ.सुजाता गवई यांचे मार्गदर्शन, सिनेमा समीक्षक डॉ.संतोष पाठारे यांनी विद्यार्थी पालक सुसंवाद यावर मार्गदर्शन केले. शिबिरादरम्यान उन्हामुळे अचानक लागलेली आग विझविण्यास स्वयंसेवक व अधिकार्‍यांनी पुढाकार घेत अग्निशामक दलास संपर्क करून पाचारण केले. स्वयंसेवकांनी दाखविलेल्या शौर्याची शांतीवन प्रशासनाने प्रशंसापत्र दिले.

29 एप्रिल रोजी सकाळी शिबिराचा समारोप समारंभ पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शेट्ये तथा राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या रायगड उत्तर विभागाचे समन्वयक डॉ. बबन जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. शिबिरात विशेष कामगिरी बजावणार्‍या 15 स्वयंसेवकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्य कार्यक्रम अधिकारी प्रा. सुर्यकांत परकाळे यांनी मानाचे सर्वोत्कृष्ट शिबिरार्थी म्हणून ओम लंके आणि मयुरी जाधव तथा सर्वोत्कृष्ट नेतृत्व म्हणून कौस्तुभ मुंडे आणि गौरी सुंबे यांची नावे जाहीर केली. याबरोबर शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता शारीरिक संचालक डॉ. विनोद नाईक, शिक्षकेत्तर कर्मचारी मिलिंद पाटील, संतोष घनसोळकर, स्वप्नील लिंगायत, आतिश भोईर, चंद्रकांत परकाळे, केतन पाटील यांच्या सत्कार केला. आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. आकाश पाटील व सूत्रसंचालन अभिषेक पाटील याने केले.

या सात दिवसीय विशेष रहिवासी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थ्येचे चेअरमन लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी.देशमुख, आमदार प्रशांत ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ.एस.टी.गडदे यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक केले.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply