Breaking News

पनवेल प्रभाग क्रमांक 19मध्ये राबविली स्वच्छता मोहीम

पनवेल : रामप्रहर वृत्त

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 21) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

पनवेल महापालिकेच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महापालिका क्षेत्रात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. यासोबतच स्वच्छ सर्वेक्षण 2022मध्ये पनवेल महापालिकेच्या माध्यमातून चांगले काम करून स्वच्छ पनवेल सुंदर पनवेल करण्याच्या दृष्टीकोनातून पाऊले उचण्यास येत आहेत. मंगळवारी प्रभाग क्रमांक 19मध्ये स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला.

या वेळी प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे,  नगरसेवक राजू सोनी, अनिल भगत, नगरसेविका दर्शना भोईर, रूचिता लोंढे, मधुकर उरणकर, सुनील खळदे, तानाजी झुगे, यशवंत जाधव, उमेश भोसकर, सचिन उरणकर, संतोष ढगे, राजू कोळी, हरिश्चंद्र भगत, उमेश शेट्टे, बबलु भोसकर, गणेश हजारे, गोपिनाथ लोखंडे, मानसी शेट्टे, महापालिका अधिकारी शैलेश गायकवाड, अक्षय लोखंडे, अभिजित भवर, अमर पाटील, राकेश पाटील, प्रितम पाटील, कर्डिले, अतिम, कुणाल जाधव, एमएसईबीचे अभियंता श्री. मोरे आदी उपस्थित होते.

खांदा कॉलनीमध्ये परिसराची स्वच्छता

पनवेल : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 15 मध्ये उपमहापौर सीताताई पाटील यांच्या मार्गदर्शनाझाली स्वच्छता मोहिम राबवण्यात येत आहे. त्यानुसार शुक्रवारी (दि. 21) खांदा कॉलनी सेक्टर 9 मध्ये स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेवेळी उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेविका चारुशीला घरत, खांदा कॉलनी विभाग सरचिटणीस भिमराव पोवार, हरीदास वनवे, स्वच्छता निरीक्षक सुमित गायकवाड, पर्यवेक्षक आदेश गायकवाड, श्री. लोखंडे, मनोज टाक, संजय कांबळे, प्रवीण भोसले, स्वच्छता दूत उपस्थित होते.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply