Breaking News

महड येथे बँकेत आग; मोठे नुकसान टळले

खोपोली ः प्रतिनिधी

खालापुरातील महड गावात असलेल्या रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेत शनिवारी संध्याकाळी शार्टसर्किटने आग लागल्याची घटना घडली. आगीत संगणक तसेच फर्निचर जळाले असून बँक बंद असल्याने सुदैवाने अनुचित प्रकार घङला नाही. आग तातङीने विझवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले. महड भक्त निवासाच्या इमारतीत बँकेची शाखा असून शनिवारी संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास बँकेतून धूर येत असल्याचे भाविक व महड येथील सुरक्षारक्षकांनी पाहिले.तातडीने बँकेचे शटर उघडण्यात आले. संगणक पेटून त्यातून धूर येत असल्याचे लक्षात येताच सिलिंडरच्या साहाय्याने आग विझविण्यात आली.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply