Breaking News

पनवेल महापालिका मुख्यालयाचे भूमिपूजन; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका मुख्यालयाचे मंगळवारी (दि. 3) अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर भूमिपूजन करण्यात आले. पनवेल महापालिका हद्दीतील नवीन पनवेल सेक्टर 16, भूखंड क्रमांक 4 येथे पालिका मुख्यालयाची भव्य इमारत उभारली जाणार आहे.
भूमिपूजन समारंभास महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, प्रमिला पाटील, अरुणा भगत, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक अनिल भगत, मनोहर म्हात्रे, हरेश केणी, नगरसेविका हेमलता म्हात्रे, युवा नेते समीर कदम, अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, महापालिकेचे अधिकारी संजय कटेकर, श्री. साळुंखे आदी उपस्थित होते.

अशी असणार रचना
मुख्यालयाच्या इमारतीचे बांधकाम तळघर, तळमजला व सहा मजले असे करण्यात येणार आहे. यातील मुख्य सभागृहाची आसन क्षमता 224 असणार आहे. याशिवाय दोन समिती सभागृह व एक बहुद्देशीय हॉल असतील. या ठिकाणी 183 चारचाकी वाहने व 1113 दुचाकी वाहने उभी करण्याची सोय असणार आहे. या मुख्यालय इमारत उभारणीचा अंदाजित खर्च 110 कोटी रुपये असून कामाचा ठेका हर्ष कन्सक्ट्रशनला देण्यात आला आहे.

आम्ही महापालिका मुख्यालय, महापौर बंगला, प्रभाग समिती कार्यालयांसह इतर मोठ्या प्रोजेक्टच्या भूमिपूजनासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर नेत्यांच्या संपर्कात असून त्यांची कार्यक्रमासाठी वेळ मागितली आहे. आता कधीही पाऊस सुरू होऊ शकतो, मग पाया खोदण्याच्या कामाला पावसात अडचण येऊ नये म्हणून आज छोटेखानी कार्यक्रमात या कामाचे भूमिपूजन केले.
-डॉ. कविता चौतमोल, महापौर

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply