अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात अक्षय्य तृतीया आणि रमझान ईदचा सण मंगळवारी (दि. 3) मोठ्या उत्साही वातावरणात साजरा झाला. दोन धर्मियांचे सण एकत्र आल्याने धार्मिक सलोखा कायम रहावा यासाठी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हिंदू धर्मातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला अक्षय्य तृतीयेचा सण मंगळवारी होता. हा मुहूर्त साधून अनेकांनी गृहप्रवेश, वास्तुशांती, नवीन व्यवसायाचा शुभारंभ केला, तर काहींनी सोने खरेदी केले. त्यामुळे सराफ पेढ्यांमध्ये गर्दी पहायला मिळाली.
दुसरीकडे सोमवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर मंगळवारी मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली. त्यांनी सकाळीच मशिदीत जाऊन ईदची नमाज अदा केली. त्यानंतर एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ईदनिमित्त मोहल्ल्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. घरोघरी शिरखुर्म्याचा बेत होता.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper