Breaking News

कर्जतमध्ये पहाटेची अजान भोंग्याविना

कर्जत : बातमीदार

मशिदीवरील भोंग्यांचा आवाज कमी झाल्याने  मनसेच्या कार्यकर्त्यांनी कर्जतमध्ये आंदोलन केले नाही. दरम्यान, कर्जत आणि नेरळमध्ये शांतता असून पोलीस सतर्क असल्याचे दिसून येत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मशिदीवरील अजान भोंगे न लावता व्हावी, अन्यथा मनसेचे कार्यकर्ते मशिदीसमोर भोंगे लावून हनुमान चालिसा पठण करतील असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर कर्जत पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी मनसेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील, तालुका अध्यक्ष महेंद्र निगुडकर, शहर अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्यासह 20 कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तर नेरळ पोलीस ठाण्याने मनसेच्या 15हून अधिक कार्यकर्त्यांना 149च्या नोटीस बजावल्या आहेत तसेच मशीद ट्रस्टच्या मौलाना यांना नोटीस बजावून भोंग्यांचा आवाज 55 डेसिबलपेक्षा अधिक राहणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन केले होते. कर्जत तालुक्यात बुधवारी (दि. 4) पहाटेची अजान भोंग्याविना झाली, तर नंतरच्या अजान या 55 डेसिबल एवढ्या आवाजात झाल्या. नेरळमध्ये गेले चार दिवस सकाळची अजान भोंग्याविना होत असून आवाजाचे निर्बंध पळाले जात असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी कोणत्याही मशिदीसमोर आंदोलन केले नाही.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply