Breaking News

नवी मुंबईत शिवसेनेला धक्का

दिघा विभागातील माजी नगरसेवकांचा भाजपत प्रवेश

नवी मुंबई : बातमीदार

दिघा विभागातील दिग्गज माजी नगरसेवक नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते आणि गवते परिवाराने त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह स्वगृही म्हणजेच भारतीय जनता पक्षामध्ये मंगळवारी (दि. 19) प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. माजी प्रभाग समिती सदस्य दामोदर कोटीयन, माजी प्रभाग समिती सदस्य संतोष मुळ्ये, दीपाली सोनकांबळे, चंद्रहास सोनकांबळे या गवते समर्थकांनीदेखील या वेळी भाजपत प्रवेश केला. माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांनी या सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले. ऐरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, जयवंत सुतार, सुधाकर सोनावणे, माजी स्थायी समिती सभापती अनंत सुतार, शुभांगी पाटील, माजी सभागृह नेते रवींद्र इथापे, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, माजी सभापती डॉ. जयाजी नाथ, माजी नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी नगरसेवक लीलाधर नाईक, सुरज पाटील, विकास झंझाड, विरेश सिंह आदी उपस्थित होते. आपल्या प्रास्ताविकात अनंत सुतार यांनी नवीन गवतेसह त्यांच्या सर्व सहकार्‍यांनी गणेश नाईक यांचेच नेतृत्व मानले असून त्यांच्या घर वापसीबद्दल आनंद व्यक्त केला. गणेश नाईक म्हणाले, नवीन गवते जरी शरीराने दूर गेले होते तरी मनाने आमच्यासोबतच होते. एका विशिष्ठ परिस्थितीत त्यांना पक्ष सोडण्याचा  निर्णय घ्यावा लागला होता. गवते हे संदीप नाईक यांच्या संपर्कात होते. दीड महिन्यापूर्वीच ते संदीप नाईक यांच्या समवेत विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. भाजपत पुन्हा प्रवेश करण्याचे निश्चित केले होते. दिघा येथील प्रलंबित प्रश्न सरकारकडे पाठपुरावा करून आपण सोडवू. या वेळी आपल्या भावना व्यक्त करताना नवीन गवते यांनी विशाल मनाने पुन्हा भाजप स्वीकारल्याबद्दल नाईक यांचे आभार मानले. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावरील विश्वास आणि देशाचा तसेच सर्व घटकांचा विकास करण्याची भाजपची भूमिका यामुळे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असे सांगितले. माजी आमदार संदीप नाईक यांनी आपल्याला सदैव आधार दिला. त्यामुळे दिघा विभागात 150 कोटी रुपयांची विकासकामे करू शकलो, असे सांगितले.

दीड महिन्यापूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. भाजपमध्ये परतण्याचे तेव्हाच ठरवले होते. दिघा येथील झोपडपट्टीचा विकास आणि अनधिकृत इमारतींचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन फडणवीस यांनी मला दिले आहे. दिघ्याचा पुढील विकास हे माझे ध्येय आहे.

-नवीन गवते, माजी नगरसेवक

 

शिंदे गटाबरोबर सुसंवाद ठेवून काम करू -संदीप नाईक

नवीन गवते, अपर्णा गवते, गवते परिवार हे सक्षम आणि कर्तबगार लोकप्रतिनिधी आहेत. महाविकास आघाडीत कामे होत नसल्याने त्यांची घुसमट होत होती. दीड महिन्यापूर्वीच त्यांनी भाजपमध्ये पुन्हा दाखल होण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे गटाच्या नगरसेवकाबरोबर सुसंवाद ठेवून काम करू, असे माजी आमदार संदीप नाईक म्हणाले.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply