Breaking News

पनवेल महापालिकेकडून अडीच टन प्लास्टिक जप्त

सव्वा दोन लाखांचा दंड वसूल

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रतिबंधीत प्लास्टिकचा वापर करणार्‍या व्यापार्‍यांवर शनिवारी (दि. 1) सकाळी 6.00 वाजल्यापासून अचानक धाडी घालुन सुमारे 2.5 टन प्लास्टिक जप्त केले. तसेच दोन लाख 25 हजार रूपयांचा दंड वसूल केला.  या प्रतिबंधित प्लास्टिकमध्ये पिशव्या व प्लास्टिकच्या वस्तू आढळून आल्या. महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशानुसार उपआयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने कारवाई केली. या पथकात  अ प्रभागाचे प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे, ब प्रभागाचे प्रभाग अधिकारी रमाकांत तांडेल, क प्रभागाचे प्रभाग अधिकारी सुरेश गांगरे, अभियंता प्रितम पाटील, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, पर्यवेक्षक अरुण कांबळे यांच्यासह 40 कर्मचार्‍यांचा समावेश होता. यापुर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अचानकपणे कारवाई करण्यात येऊन सुमारे 100 व्यापार्‍यांची तपासणी करुन त्यापैकी 45 व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून दोन लाख 25 हजार रुपये वसूल करण्यात आला. त्यानंतर गुजराती हायस्कूलसमोरील रोजबाजार, उरण नाका (कर्नाळा सर्कल) भाजीमंडीतील काही प्लास्टिक व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे नवीन पनवेल सेक्टर 17 मधील प्लास्टिकचे ठोक व्यापारी व प्लास्टिक वस्तुंच्या ठोक व्यापार्‍यांवर धाडी घालून सुमारे 2.5 टन वजनाचे प्लास्टिक पिशव्या, चमचे इतर वस्तू असा प्रतिबंधित प्लास्टिक माल जप्त करण्यात आला. तिसर्‍यांदा गुन्हा केल्याने 25000 रुपये दंड वसूल करण्यात आला.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply